पुणेः राष्ट्रवादीचे आमदार यांनी करोनाच्या कॉलर ट्यूनबाबत ट्विटरवरून लोकांची मते मागवली होती. त्या साठी त्यांनी एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणाचा कौल आज त्यांनी जाहीर केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करून कॉलर ट्यूनबाबत नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आपल्यापैकी कितीजणांना करोनाची कॉलर ट्यून ऐच्छिक करायला हवी असं वाटतं? असा सवाल त्यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या प्रश्नाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. ८८ टक्के लोकांनी करोनाची कॉलर ट्यून बंद करावी असा कौल दिला आहे तर, १२ टक्के लोकांनी कॉलर ट्यूनचं समर्थन केलं आहे.

रोहित पवारांच्या घेतलेल्या सर्वेक्षणात ३००९ जणांनी आपला सहभाग नोंदवला होता. सर्वेक्षणाचा कौल हाती येताच रोहित पवारांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉलर ट्यूनबाबत फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉलर ट्यून काढण्याची मागणी केली होती. या कॉलर ट्यूनमुळं भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला होता. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी करोना विषाणूबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची विनंती केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here