कोल्हापूर: जवळच्या येथील त्या चौकात मराठी बांधवानी ‘’ असा फलक झळकवला आणि एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करतानाच ‘शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पिरणवाडी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. काही कन्नड संघटनांनी या चौकात क्रांतिकारक यांचा पुतळा बसवला. याला मराठी बांधवांनी विरोध केला. तो पुतळा इतरत्र बसवण्याची मागणी केली. पण कर्नाटक सरकारने दोन्ही गटांशी चर्चा करत पुतळा न हटवण्याचा निर्णय घेतला. पण या चौकास शिवाजी महाराजांचे नाव देण्यास मान्यता दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सकाळी मराठी बांधवांनी या चौकात शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक झळकवला. यावेळी सर्वांनी जोरदार जल्लोष केला.

नेमकं काय घडलं होतं?

बेळगाव नजीकच पिरणवाडी गाव असून या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. स्थानिक मराठी भाषिकांचा विरोध असतानाही हा पुतळा बसवला गेला. मराठी भाषिकांचा विरोध डावलून स्थानिक कन्नड संघटनांच्या पुढाकाराने रातोरात रायान्ना यांचा पुतळा बसविल्याने त्याला तीव्र विरोध झाला. विरोध करणाऱ्या मराठी भाषिकांवर पोलिसांकडून लाठ्या चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. गंभीर बाब म्हणजे कर्नाटक सरकारचा कन्नड संघटनांना उघड पाठिंबा होता. कर्नाटकचे ग्रामीण पंचायतराज मंत्री किशोर ईश्वरआप्पा आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते रायान्ना यांच्या पुतळ्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले. त्याचा मराठी भाषिकांनी तीव्र निषेध केला. पिरणवाडी गावात हा पुतळा बसविण्यास कुणाचीच हरकत नव्हती मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा पुतळा नको अशी मराठी भाषिकांची भूमिका होती. त्यातून नंतर कर्नाटक सरकारने दोन्ही गटांशी चर्चा करून तोडगा काढला व या चौकात आता शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक दिमाखात झळकला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here