पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन अजित पवार यांचं कौतुक करतात तर दुसरीकडे अजित पवार भाजपच्या नेत्यांचं कौतुक करत असतात. पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातले फिट मंत्री म्हणून नावाजलं होतं. तर आज पुण्यातल्याच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला पराक्रमाची गोष्ट अजित पवार यांनी मोठ्या खुबीने सांगितली.

पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १०६ फूट उंच ध्वजाचे लोकार्पण हडपसर भागात पार पडलं. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. तिथे सगळ्या वेगवेगळ्या देशाच्या पंतप्रधानांना ओळीनुसार उभे करत होते. परंतु त्या देशाने अशी एक चूक केली. खाली जमिनीवर त्या देशाचं नाव द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी चुकून तिथे त्या त्या देशाचे छोटे छोटे झेंडे चिटकवले होते. आणि त्या ठिकाणी त्या त्या देशाच्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी जाऊन उभं राहायचं होतं होतं.

साहेबांच्या विरोधात सूर, बीडकरांचा गोंधळ, २ मिनिटांत भाषण गुंडाळावं लागलं, रोहित पवारांचा निशाणा
आपल्या पंतप्रधानांच्या लक्षात आलं की खाली आपला तिरंगा लावलेला आहे. त्यांनी खाली वाकून त्या तिरंग्याचे स्टिकर घेतलं आणि गुपचूप आपल्या खिशात ठेवलं, की आपला तिरंगा कोणाच्या पायाखाली येता कामा नये. एवढा दूरचा विचार आपल्या पंतप्रधानांनी केला. बारीक सारी गोष्टी असतात पण त्याच्याने जगाला एक वेगळा संदेश जातो. एक आदर्श त्यामधून उभा राहतो, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

जायकवाडीच्या आवर्तनामुळे नगर-नाशिकची धाकधूक, ‘समन्यायी’ची टांगती तलवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here