वाचा:
ऐन मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग मधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने याची दखल घेऊन मच्छिमारांसाठी ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल वैभव नाईक यांनी शेख यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
वाचा:
केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योग्य अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणे आवश्यक असून सदर बैठक आयोजित करण्याची मागणी वैभव नाईक यांनी अस्लम शेख यांच्याकडे केली. त्याबाबतही शेख यांनी नियोजनासाठी बैठक आयोजित करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा फायदा देखील महाराष्ट्रात जास्तीत जास्त करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times