वाचा:
देशात केल्यापासून रेल्वेची सेवा बंद आहे. त्यानंतर एक जूनपासून दोनशे स्पेशल रेल्वे चालवल्या जात आहेत. राज्य सरकारने जिल्हा बंदी उठवली असून, प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून पुणे-मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस तसेच लोकल गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. मात्र, राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नसल्याचे रेणू शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाचा:
दरम्यान, मुंबई आणि पुणे हे दोन्ही करोनासाठी हॉटस्पॉट आहेत. पुण्यात करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या स्थिती राज्य सरकार अत्यंत सावधपणे पावले उचलत आहेत. केंद्र सरकारने देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मुंबई मेट्रो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने लांबणीवर टाकला आहे. त्याचवेळी मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याती मागणी होत असतानाही सरकारने त्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. राज्यात मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा १ ते ३० सप्टेंबर असा असणार आहे. या टप्प्यात जिल्हा बंदी उठवण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवेचे भवितव्य मात्र पूर्णपणे राज्य सरकारच्या परवानगीवर विसंबून आहे. अद्याप त्याबाबत कोणतीच मागणी राज्य सरकारने रेल्वेकडे केलेली नाही, हे स्पष्ट झाल्याने राज्य सरकार येत्या काळात कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मार्गावरून नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, हे मात्र निश्चित आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times