मुंबईः राज्यात करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज राज्यात तब्बल १८ हजार १०५ इतक्या मोठ्या संख्येनं नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दोन दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांचा आकडा १५ हजारांच्यावर गेला आहे. त्यामुळं राज्यावर करोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. ()

गेल्या दोन दिवसांपासून सतत करोना रुग्णवाढीचा आकडा वाढत आहे. कालही १७ हजारांवर अधिक रुग्ण वाढले होते तर, आजही १८ हजार १०५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील करोना रुग्णवाढीची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ चाचण्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

राज्यात करोना मृतांचा आकडाही वाढत आहे. आज तब्बल ३९१ करोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृतांची संख्या २५ हजार ५८६ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३.०३ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात सध्या २ लाख ०५ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

राज्यात आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत ६ लाख १२ हजार ४८४ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२. ५८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३६ हजार ७४५ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here