नवी दिल्लीः एलएसीवर भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. चीन एकीकडे चर्चेचा दिखावा करून शांततेची भाषा बोलतोय तर दुसरीकडे चिनी सैनिक भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत चिनी सैनिकांच्या प्रत्येक घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. दरम्यान, एलएसीवरील सध्या सुरू असलेल्या तणावाबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वक्तव्य करण्यात आलंय. गेल्या चार महिन्यांत जे पाहिले ते एलएसीवरील यथास्थिती बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असं भारताने म्हटलं आहे.

भारतीय लष्कराचे कमांडर अजूनही सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गुंतले आहेत. चीनने एलएसीवरील यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. एलएसीवर शांतता राखण्याच्या मूलभूत तत्त्वांचे चीन पालन करेल, अशी भारताची आपेक्षा आहे.

चर्चा आणि शांततेतून सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. पुढील मार्ग हा लष्करी आणि मुत्सद्दी वाटाघाटीचा आहे. यामुळे सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आणि सीमेवरी सैनिक मागे हटवण्यासाठी चीनने प्रामाणिकपणे पर्यत्न करावे, अशी आमची मागणी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

चिनी अॅप्सवर बंदी आणण्याबाबत परराष्ट्र मंत्रालय म्हणाले…

एफडीआयसाठी भारताची कवाडं खुली आहेत. त्यात इंटरनेट कंपन्या आणि डिजिटल तंत्रज्ञान कंपन्यांचादेखील समावेश आहे. भारत सरकारने जारी केलेल्या नियम-कायद्यांचे पालन करण्याची त्यांची जबाबदारी आहे, असं सांगत चीनच्या ११८ मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावर परराष्ट्र मंत्रालयाने सरकारची भूमिका स्पष्ट केली. भारत सरकारने डिजिटल स्ट्राइक करत चीनच्या पबजीसह ११८ अॅप्सवर बंदी घातली होती.

आम्ही मुत्सद्दी माध्यमांद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात आहोत. कुलभूषण जाधव यांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार सर्वतोपरी पावले उचलत आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांना डिफेन्स काउन्सिल पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here