शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करतानं कंगनानं मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर वाटते, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक ट्विप्लसनं कंगनाला मुंबईचं महत्त्व समजावून सांगतं तिला चांगलांच धारेवर धरलं आहे. मुंबई सगळ्यांनाच आपलेसं करते, इथं सगळ्यांनाच सुरक्षित वाटते, जर कोणी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आमच्या मुंबईवर आरोप करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असं एका युजर्सनं ट्विट केलं आहे.
तर, एकानं युजर्सनं मुंबई नेहमीच बाहेरील राज्यातील नागरिकांना आपलेसे करते. ते इथं पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान कमवतात आणि त्या बदल्यात मुंबईला परत काय देतात? असा संतप्त सवाल केला आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना हे निंदनीय आहे. असं म्हटलं आहे.
कलाकारांनाही कंगनाच्या या विधानावरून तिला सुनावले आहे. अभिनेता स्वप्निल जोशी यांनं आय लव्ह मुंबई असं ट्विट केलं आहे. तर, सोनु सूदनंही कंगनावर अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे. मुंबई हे शहर नशीब बदलते. असं तो म्हणाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times