नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या ( ) तिसर्‍या वार्षिक शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. करोना व्हायरसच्या संसर्गा निदर्शनास आणून दिले आहे की जागतिक पुरवठा साखळी केवळ किंमतीवर नको तर विश्वासावर आधारित असावी, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी उल्लेख टाळत चीनवर हल्लाबोल केला आणि जगाला सावध केलं.

जागतिक पुरवठा साखळी केवळ खर्चावर आधारित नसावी तर विश्वासावर आधारित असायला हवी, हे आपल्याला करोना व्हायरसच्या साथीने दाखवून दिले आहे, असं म्हणन मोदींनी चीनचा उल्लेख न करता निशाणा साधला. एखाद्याच्या हलगर्जीपणामुळे फक्त जगातच पसरला नाही तर अशा बिकट स्थितीतही संकटाचा सामना करणाऱ्या देशांना निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरवल्या, असं मोदी म्हणाले.

भारत हे असे ठिकाण आहे जिथे हे सर्व गुण आहेत. विदेशी गुंतवणूकीसाठी भारत एक आकर्षक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. अमेरिकेपासून आखाती देशांपर्यंतचे सर्व देश भारतावर विश्वास ठेवत आहेत. अ‍ॅमेझॉन, गुगल सारख्या कंपन्या भारतासाठी दीर्घकालीन धोरणांची घोषणा करत आहेत, असं म्हणत मोदींनी जीएसटी आणि कामगार सुधारणांचंही कौतुक केलं.

करोना व्हायरस दरम्यान सामाजिक सुरक्षा, गरिबांच्या संरक्षणासाठी सरकारने उचललेली पावलं यांची माहिती दिली. करोना व्हायरसच्या या जागतिक साथीने सर्व गोष्टींवर परिणाम झाला आहे. पण १३० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि अपेक्षांवर परिणाम झालेला नाही. भारत विदेशी गुंतवणूकीसाठी सर्वात आकर्षक बाजारपेठ आहे. यामुळे आमच्या सोबत या, असं म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं.

USISPF मुळे भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत आहेत. २०२० ची सुरुवात झाली तेव्हा, जागतिक साथीचा प्रत्येकावर परिणाम होईल अशी कल्पना कोणी केली होती का? ही साथ आपली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, आर्थिक व्यवस्था आणि संयमांची परीक्षा घेत आहे. आपले लक्ष क्षमता वाढवणं, गरिबांचं रक्षण करणं आणि नागरिकांचे भविष्य सुधारण्यावर केंद्रीत असायला हवं, असं मत मोदींनी मांडलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here