वाहन चालवताना किंवा सायकल चालवताना मास्क घालणं बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी उत्तर दिलं. वाहन चालवताना मास्क न घातल्याने अलिकडेच शेकडो चालकांना दंड आकारण्यात येत होता. यासंदर्भात मोठ्या संख्येने तक्रारी वाढत होत्या. यावर भूषण यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘गाडी चालवताना किंवा एकट्याने सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना सरकारने दिलेली नाही’, असं भूषण यांनी स्पष्ट आहे.
‘शारीरिक हालचालींवरून नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. नागरिक दोघे किंवा तिघांच्या गटात सायकल चालवताना किंवा जॉगिंग करताना दिसत आहेत. जर तुम्ही सायकल चालवत असाल किंवा समूहाने जॉगिंग करत असाल तर एकमेकांना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगही राखावं’, असं भूषण यांनी सांगितलं.
देशात गुरुवारी करोनाचे ८३, ८८३ नवीन रुग्ण आढळून आले. यानुसार आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील करोनाच्या एकूण रुगणांची संख्या ही ३८, ५३, ४०६ इतकी झाली आहे. यापैकी ६७,३७६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, १५ जून ते २ सप्टेंबर दरम्यान, मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दिल्ली पोलिस राजधानीत अडीच लाखाहून अधिक जणांना दंड (चालान ) आकारला आहे. यातून १३ कोटींचा दंड वसूल झाला आहे. यापैकी २, ३३,५४५ जणांना मास्क न घातल्या प्रकरणी दंड भरावा लागला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times