पुणे: एकतर्फी प्रेम करणाऱ्या टोळक्यांची जमात वाढू लागली आहे. मुलीने आपल्या प्रेमाला प्रतिसाद नाही दिला, तर तिचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे हातकंडे वापरण्यात येतात. ते ही उपाय काम करत नसतील तर गोष्ट छेडछाडीपर्यंत येऊन पोहचते. त्यामधून घडतो तो गुन्हा. मात्र त्या वेळी मुलं ही कोणत्याही टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तयार होतात. असाच एक प्रकार पुण्यातील कोंढवा भागात घडला आहे.
बाहेर चिमुकली खेळत होती; तरुणाने नेलं घरात, अन् बहिणीच्या साथीने घडवलं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेम करणारा टवाळखोर शाळकरी मुलीचा अनेक दिवस पाठलाग करत होता. म्हणून ही गोष्ट मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर आईने याबाबतचा जाब त्या मुलाला विचारल्यानंतर त्याने थेट मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आकाश महेंद्र रोचवानी (वय २४, रा. न्याती इस्टेटजवळ, इंदिरानगर, महमदवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिंगर प्रिंट स्टार्ट अन् वॉइस कंट्रोल इलेक्ट्रीक बाईक; रिक्षाचालकाच्या मुलाचा भन्नाट प्रयोग

आरोपी मुलगा हा पीडित शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र मुलगी त्या तरुणाला प्रतिसाद देत नव्हती. म्हणून आरोपी मुलगा नेहमी मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी पीडित मुलगी शिकवणीवरून घरी जात असताना मुलाने तिचा रस्ता अडवला आणि बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गोष्ट मुलीला खटकली आणि ही बाब तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने त्याला या गोष्टीचा जाब विचारल्यावर, आरोपी मुलगा म्हणाला की, “माझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. तर तुमच्याकडे बघून घेईल” अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ याबाबत मुलावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here