म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्माननिधी’ योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना लवकरच मिळावा यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी घेतला. हा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाआयटीचे विभागप्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

धाराशिव जिल्ह्यात पाऊस लांबला बळीराजा पुन्हा अडचणीत

पावसाळी अधिवेशन २०२३-२४ मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे, असे मुंडे म्हणाले. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अखेर पाऊस पुन्हा बरसला, कोकणात मेघगर्जनेसह पाऊस, मुंबई-ठाण्याबाबतही मोठी अपडेट

16 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here