नाशिक (सौरभ बेंडाळे) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सात महिन्यांत झालेल्या ४७ अपघातांमध्ये प्राण गमाविलेल्या १०१ प्रवाशांपैकी ४४ जणांचा मृत्यू थकवा आणि अपुऱ्या झोपेमुळे वाहन चालविण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे झाल्याची नोंद राज्य महामार्ग पोलिसांनी केली आहे. याच कारणातून समृद्धी महामार्गावर एकूण २४२ अपघातांमध्ये ७६ प्रवाशी गंभीर, तर १७८ जण किरकोळ जखमी झाले. सतत एकाच वेगात, एकाच रस्त्यावरून वाहन चालविण्यासह शरीराला विश्रांती न दिल्याने हे अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंगल यांनी नाशिकमध्ये महामार्ग पोलिस दलाच्या परिक्षेत्रनिहाय प्रमुख अधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. २९) बैठक घेतली. या बैठकीत समृद्धी महामार्गासह राज्यातील इतर महामार्गांवरील अपघातांचा आढावा घेण्यात आला. त्याठिकाणी दंडात्मक कारवाईसह सूचना फलक, आपत्कालीन यंत्रणा व इतर उपाययोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. त्यावेळी समृद्धी महामार्गावर सन २०२३ मध्ये सात महिन्यांत सर्वाधिक अपघात हे झोप आणि थकव्यामुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कसब्याचा १० कोटींचा निधी रद्द करून पर्वतीला बक्षीस, धंगेकर चिडले, दादांविरोधात आक्रमक पवित्रा, दिसतील तिथे…
वेळ आणि मृत्युमुखींची संख्या

– मध्यरात्री १२ ते पहाटे ३ या कालावधीत ४४ जण ठार

– पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत ९ मृत्यू

– सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत २१ ठार

– दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत १७ मृत्युमुखी

– रात्री ८ ते १२पर्यंत १० जणांचा मृत्यू

पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ‘ब्लॅकस्पॉट’

– राज्यभरात १ हजार ८ अपघातप्रवण ठिकाणे

– सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव आणि सोलापूरमध्ये

– या पाच जिल्ह्यांत जानेवारी ते जुलै २०२३ या कालावधीत ४ हजार १७० अपघातांमध्ये १ हजार ९०५ प्रवाशी ठार

अपघाताची कारणे आणि उपाय

– संबंधित जिल्ह्यात गस्त वाढवून, प्रबोधनासह नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी पथके कार्यरत

– सतत वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या ‘रोड हिप्नोसिस’ अपघाताचे मुख्य कारण

– अपघात टाळण्यासाठी प्रत्येक दोन-अडीच तासांनी वाहन थांबविणे, चांगली गाणे ऐकणे, दीर्घ श्वास घेणे, डोळे धुणे, कंटाळा आल्यास वाहन थांबवून काही वेळाने चालविणे, हे उपाय करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

कारमध्ये चालकाला झोप येत असल्यास ‘बीप’ करणारे मशिन्स बाजारात आहेत. ते कारमध्ये बसवावे. परंतु, पूर्ण झोप झाल्यावर आणि थकवा नसेल तेव्हाच चालकांनी वाहने चालवावीत. वाहन चालविण्यापूर्वी प्रत्येकाने स्वनिरीक्षणासह नियमांचे तंतोतंत पालन करावे.

– डॉ. रवींद्र सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महामार्ग पोलिस

समृद्धी महामार्गावरून…

कारणे – मृत्यू – गंभीर जखमी – किरकोळ जखमी – अपघात

झोप, थकवा : ४४ : ७६ : १७८ : २४२

अतिवेग : ३३ : ५३ : ९९ : १२८

टायर फुटले : १० : ७० : ७२ : १०९

वन्यजीव क्रॉसिंग : १ : ७ : १८ : ८३

वाहनात बिघाड : – : ७ : २० : २७

ब्रेकडाउन वाहन पार्किंग : २ : ६ : १६ : २२

इतर कारणे : ११ : ४३ : ८३ : ७२९

NCP Crisis: पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवार गटाची धावाधाव, अजितदादांना शह देण्यासाठी वेगवान हालचाली

18 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here