मुंबई : बहुतेक गुंतवणूकदार कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात कारण यामुळे कर बचत करण्यास मदत होते. या आर्थिक वर्षाचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटला असून एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाला असून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही कर बचतीची योजना आखली पाहिजे. ज्या पगारदार व्यक्तींचा पगार कराच्या कक्षेत येतो त्यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणुकीचे नियोजन करावे. जर तुम्ही देखील कर बचत योजना शोधत असाल तर त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात मजबूत परतावा मिळू शकतो, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देत आहोत.

पीपीएफ

पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड (पीपीएफ) अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीतील गुंतवणूक करसवलतीस पात्र असते. याचे खाते ही सुविधा देणाऱ्या सरकारी किंवा निवडक खासगी बँकेत उघडता येते. यामध्ये दरवर्षी किमान ५०० रुपये गुंतवणूक करता येते. कमाल गुंतवणऊक वार्षिक १.५० लाख रुपये इतकी करता येते. यामध्ये १५ वर्षे पैसे भरत राहावे लागते. त्यानंतर दर पाच वर्षांची मुदत वाढवून हे खाते सुरू ठेवता येते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.

प्राप्तिकर अन् ‘इतर उत्पन्न’; कमाईच्या या स्रोतांवरही भरावा लागतो इन्कम टॅक्स, वाचा सविस्तर
ईएलएसएस

इक्विटी संलग्न बचत योजना (ईएलएसएस) ही कर वाचवण्यासाठी उपयुक्त योजना आहे. यामध्ये कमाल गुंतवणइकीची कोणतीही मर्यादा नाही. किमान गुंतवणूक ५०० रुपये करावी लागते. यासाठी लॉक इन कालावधी तीन वर्षांचा आहे. चांगला ईएलएसएस फंड निवडल्यास त्यापासून सात वर्षांच्या कालावधीच्या गुंतवणुकीवर सरासरी कमाल २८.६१ टक्के परतावा मिळू शकतो. १० वर्षांसाठी हा परतावा सरासरी २५.४९ टक्के, तर १५ वर्षांसाठी तो २१.०५ टक्के असू शकतो.

एनपीएस

राष्ट्रीय पेन्शन योजना (नॅशनल पेन्शन स्कीम किंवा एनपीएस) वयाच्या ६० वर्षांपर्यंत वापरता येते. यामध्ये दरवर्षी किमान सहा हजार रुपये गुंतवावे लागतात. कमाल मर्यादा कोणतीही नाही. एनपीएशमधील गुंतवणुकीवर सरासरी ८.७० टक्के ते ९.५६ टक्के इतके व्याज मिळू शकते.

पगारदारांसाठी ITR रिफंड बाबत महत्वाची अपडेट! आता इन्कम टॅक्स रिटर्न मिळणार लवकर; कर विभागाची तयारी
एससीएसएस

सिनियर सिटीझन्स सेव्हिंग स्कीम (एससीएसएस) किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान गुंतवणूक वर्षाला एक हजार रुपये आहे. १५ लाख रुपये कमाल गुंतवणूक करू शकता. यासाठी पाच वर्षे लॉक इन कालावधी आहे. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर योजनेचा कालावधी एकदाच तीन वर्षांसाठी वाढवता येतो.

युलिप

युनिट संलग्न विमा योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आहे. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. यासाठी गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांचा असतो. मात्र पॉलिसीचा कालावधी त्यानंतरही असू शकतो.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या भवितव्यासाठी तसेच त्यांना १८ वर्षांनंतर पैसा मिळावा किंवा मुलीला तिच्या दहावीनंतर पैसा उपलब्ध व्हावा या उद्देशाने ही योजना सरकारने आणली. यामध्ये किमान गुंतवणूक २५० रुपये असून कमाल गुंतवणूक १.५० लाख रुपये आहे. सध्या या योजनेवर ८ टक्के व्याज देण्यात येत आहे.

Income Tax Refund: अद्याप आयकर परतावा मिळाला नाही? त्वरित करा हे काम, लवकरच बँक खात्यात येणार पैसे
मुदतठेवी

बँकेच्या काही मुदतठेवी या करबचत करणाऱ्या असतात. मात्र त्यासाठी तीन किंवा पाच वर्षांचा लॉकइन कालावधी असतो. या ठेवींमध्ये किमान १०० रुपये आणि कमाल कितीही रक्कम गुंतवता येते.

एनएससी

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट किवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्टातून घेता येते. यामध्ये किमान १०० रुपये गुंतवता येतात. मात्र कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. सध्या यावर ७.७० टक्के व्याज मिळत आहे. यासाठी पाच वर्षांचा लॉकइन कालावधी असतो.

आयुर्विमा

आयुर्विमा पॉलिसीचा किमान प्रीमियम वार्षिक पाच हजार रुपये असेल तर तो करबचतीसाठी पात्र असतो. कमाल प्रीमियमची मर्यादा नाही. मात्र वर्षाला पाच लाख रुपयांहून अधिक प्रीमियम असेल तर मात्र अशा पॉलिसी आता करपात्र होणार आहेत.

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here