नवी मुंबई : नवी मुंबईत जुलै महिन्यामध्ये मुसळधार बरसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र उसंत घेतली. या वातावरण बदलामुळे विषाणूसंसर्गाचे रुग्ण नवी मुंबई परिसरात वाढले आहेत. खासगी रुग्णालयांसह पालिकेच्या रुग्णालयात ताप, खोकला, अंगदुखी आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

वातावरणात सध्या कमालीचा बदल झाला आहे. कधी पाऊस, तर कधी ऊन पडत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांत वाढ झाली आहे. अशा वातावरणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार बळावले आहेत. वयोवृद्ध तसेच लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धोका त्यांना आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

Pune Fire: पिंपरीत हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू
शहरात सध्या डोळ्यांच्या साथीचे रुग्णही वाढत आहेत. २७ जुलैपासून आतापर्यंत डोळे आल्याचे एक हजार ५७८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणबदलामुळे साथींचे रुग्ण आढळून येत आहे. लोकांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ताप कमी न झाल्यास तत्काळ रक्ततपासणी करून घ्यावी, असा सल्ला जनरल फिजिशिअन डॉ. प्रतीक तांबे यांनी दिला आहे.

पावसाळ्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून घरात व सभोवतालच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. हिवताप, डेंग्यूची लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या नजिकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व महापालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा घ्यावी. पालिकेमार्फत गृहभेटी देणाऱ्या हिवताप कर्मचाऱ्यास संपूर्ण सहकार्य करावे.

– डॉ. प्रशांत जवादे, आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका

मी साईडिंगला नाही, IAS दर्जाचे सचिवही माझ्याशी बोलायला घाबरतात : चंद्रकांतदादा पाटील

18 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here