नवी दिल्ली: क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सिनेस्टारपासून ते राजकीय नेत्यांचा समावेश होतो. अशाच एका क्रिकेटच्या चाहत्याने जो देशातील एक मोठा राजकीय नेते देखील आहे, त्याने मास्टर ब्लास्टर आणि भारताचा माजी कर्णधार यांच्यावर नाराज होतो असे सांगितले. केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या या नेत्याची कशासाठी नाराजी होती ते जाणून घेऊयात…

काँग्रेसचे खासदार आणि माजी परराष्ट्र राज्य व्यवहार मंत्री शशी थरूर हे क्रिकेटचे खुप मोठे चाहते आहेत. एका मुलाखतीत त्यांनी क्रिकेटमधील ला प्रचंड महत्त्व असल्याचे सांगितले. या खेळातील हा सर्वात चांगला प्रयोग असल्याचे थरूर म्हणाले.

वाचा-
स्पोर्टसक्रीडाच्या फेसबुकपेजवर बोलताना थरूर म्हणाले, मी डीआरएसचा मोठा चाहता आहे. भारताला सुरूवातीलाच याचा वापर करण्यासाठी होकार द्यायला हवा होता. सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी यांनी जेव्हा डीआरएस लागू करण्याबाबत रस दाखवला नाही तेव्हा मी निराश झालो होतो.

वाचा-
तंत्रज्ञानाचा मी मोठा चाहता आहे. मी सुरुवातीपासूनच डीआरएसला पाठिंबा देत आहे. जेव्हा सचिन आणि धोनी यांनी या गोष्टीला नकार दिला होता तेव्हा मी नाराज झालो. मी नियमीतपणे क्रिकेट पाहत असतो आणि अनेकदा असे दिसते की खराब निर्णयांमुळे आपले किती नुकसान होते. तेव्हा मला समजत नव्हते की डीआरएसला आपण विरोध का करत होतो, असे थरूर म्हणाले.

वाचा-
आता मी डीआरएस शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहणारच नाही. धोनीने डीआरएसचा अचूक वापर करून स्वत:चे एक वेगळे नाव तयार केले. धोनीचे डीआरएसचा निर्णय इतका अचूक होता की सोशल मीडियावर धोनी रिव्ह्यू सिस्टम असे नाव पडले होते.

यामुळे चूका रोखल्या जातात त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भविष्यात डीआरएसशिवाय सामने होणार नाहीत. डीआरएस चूकांना रोखते आणि सामना पाहणाऱ्यांच्यात एक रोमांच निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.

DRSला विरोध करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. भारताने २००८ साली श्रीलंकेविरुद्ध त्याचा वापर केला. पण भारताचा कर्णधार धोनीला डीआरएस मान्य नव्हते. पण त्यानंतर भारताने त्याचा स्विकार केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here