नवी दिल्ली : भाऊ आणि बहीण यांच्यातील विशेष नाते साजरे करण्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधते आणि त्या बदल्यात भाऊ त्यांना भेट देतो. बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत, परंतु आजही अनेक भाऊ आपल्या बहिणींना राखीच्या निमित्त रोख रक्कम देण्यास प्राधान्य देतात. तुम्हीपण तुमच्या बहिणीला मोठी रोख रक्कम देण्याचा विचार करत असाल तर आधी आयकरचा (इन्कम टॅक्स) महत्त्वाचा नियम जाणून घेतला पाहिजे.

तुमच्या बहिणीला भेट म्हणून मोठी रक्कम भेट म्हणून दिल्यास तुम्हाला त्याच्यावर कोणता कर भरावा लागणार का नाही, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे नाहीतर पुढे तुम्हाला भुर्दंड बसेल.

राखीच्या धाग्याला महागाईचं ‘बंधन’! यंदा राख्यांच्या दरात पाच ते सात टक्क्यांची वाढ
किती रक्कम करमुक्त असेल?
तज्ञांनुसार जर एखाद्या व्यक्तीने रक्ताने संबंधित असलेल्या नातेवाईकाला रोख रक्कम दिली तर अशा परिस्थितीत दिलेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला कितीही रक्कम देऊ शकता, त्यावर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. विशेष म्हणजे आयकर नियमांनुसार कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार इतर कोणत्याही व्यक्तीला कितीही भेटवस्तू देऊ शकते. यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

तथापि जर भेटवस्तूची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्याचे बँकिंग तपशील सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. तज्ञांनुसार जर काही नाती बाजूला ठेवली, तर तुम्हाला आयकर कलम ५६(२)(x) अंतर्गत इतर स्त्रोतांकडून भेटवस्तू मिळाल्यावर कर भरावा लागेल.

भावाला दिलेलं अखेरच वचन ती ७७व्या वर्षीही जपतेय, महादेव-शालिनीची ही कहाणी डोळ्यात पाणी आणेल
बहिणीला देऊ शकता स्टॉक गिफ्ट?
यावेळी रक्षाबंधनाला तुम्हाला तुमच्या बहिणीला गिफ्ट म्हणून स्टॉक (शेअर) द्यायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. कोणत्याही कराची चिंता न करता तुम्ही तुमच्या खात्यातून तुमच्या बहिणीच्या डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्सफर करू शकता आणि इथे तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

राखीनिमित्त बहिणींसाठी आर्थिक भेट
यावेळी राखीच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला रोख रक्कम देण्यासोबत आर्थिक भेटही देऊ शकता जेणेकरून तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत होईल. उदाहरणार्थ गोल्ड बाँड, सरकारी योजना, SIP अशी आजच्या काळात अनेक गुंतवणूक साधने आहेत जी तुम्ही तुमच्या बहिणीला भेट करून तिचे भविष्य सुरक्षित करू शकता.

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here