पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागातील मंगला चित्रपटगृहात गदर २ हा सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर १५ ते २० जणांनी नितीन म्हस्के याचा धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केला होता. पूर्ववैमनस्याच्या रागातून म्हस्के याचा खून करण्यात आला होता. मात्र या घटनेनंतर पुणे शहर हादरलं होतं. पोलिसांनी जलद गतीने तपास करत खून करणारा मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आता पोलिसांनी मुख्य आरोपी यल्ल्या आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सागर कोळणटी उर्फ यल्ल्या आणि त्याचे १९ साथीदार या सगळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

MVA Press: विचारधारा भिन्न पण एकत्र का आलो उद्धव ठाकरेंनी सांगितलं, शरद पवारांनी नेमकं कुणाला दिलं आव्हान?

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खून करणारा आरोपी सागर कोळणटी उर्फ यल्ल्या याचा आणि खून झालेली व्यक्ती नितीन म्हस्के या दोघांचा जुना वाद होता. नितीन म्हस्के याने सागर कोळणटी उर्फ यल्ल्या याला जीवे मारण्याचा उदेशाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत वार केले होते. सागर कोळणटी उर्फ यल्ल्या याचा जीव गेला म्हणून तिथे सोडून तेथून नितीन पसार झाला होता. मात्र त्या हल्ल्यातून यल्ला याा जीव वाचला आणि या हल्ल्याप्रकरणी नितीन म्हस्के ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तुरुंगात होता.

यादरम्यान सागर कोळणटी उर्फ यल्ल्या हा हॉस्पिटलमध्ये दाखल होता. मात्र हाच राग त्याच्या मनात सातत्याने धुमसत होता. सागर कोळणटी उर्फ यल्ल्या याने नितीन म्हस्के याची तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहिली आणि बरोबर संधी साधून नितीन म्हस्के याचा खून केला. याप्रकरणी आता अखेर सागर कोळणटी उर्फ यल्ल्या व त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here