कोलंबो: श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी इंडियन ऑईलच्या तेल टँकर शिपला आग लागली. या जहाजावरील २३ जण जखमी झाले असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. नौदलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. न्यू डायमंड या जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली आणि त्यानंतर जहाजावर ही आग फैलावली असल्याची माहिती प्रवक्ते इंदिका सिल्वा यांनी दिली.

इंडियन ऑईलच न्यू डायमंड हे तेलवाहू जहाज कुवैतहून कच्चे तेल घेऊन भारताकडे येत होते. जहाजाला आग लागल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाकडे मदत मागण्यात आली. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे तीन जहाज आणि एक डॉर्नियर एअरक्राफ्टने तातडीने हालचाल सुरू केली. नौदल आणि हवाई दलाच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आयसीजी शौर्य, सारंगला तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय डॉर्नियर एअरक्राफ्टही मदत कार्यात असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. हंबनटोटा बंदरावर तैनात असलेल्या दोन रशियन बनावटीच्या अॅण्टी सबमरीन युद्ध नौकांही बचाव कार्यात उतरल्या आहेत.


एक कर्मचारी बेपत्ता

सिल्वा यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्यासाठी युद्ध नौका व इतर बचाव दल घटना स्थळी दाखल होईपर्यंत तेलवाहू जहाजाचे १९ कर्मचारी जीवनरक्षक बोटीत होते. नौदलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर एक कॅप्टन आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांनीदेखील तेलवाहू सोडले. तर, एक कर्मचारी बेपत्ता आहे. या तेलवाहू जहाजाला आग लागली तेव्हा हे जहाद श्रीलंका पूर्वपासून जवळपास, ३८ समुद्र मैल अंतरावर होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here