मुंबई: करण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर भाजपचे आमदार भडकले आहेत. ‘माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को चाचणी करायला तयार आहे. पण या प्रकरणात अडकलेले ठाकरे सरकारमधील बडे नेते व मंत्री ही टेस्ट करायला तयार आहेत का,’ असं आव्हान कदम यांनी काँग्रेसला दिलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलीस व ठाकरे सरकारवर सातत्यानं आरोप करणारे राम कदम व यांचा समाचार घेताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ‘राम कदम यांना विवेक मोईत्रा याच्या काळापासून ते आतापर्यंतच्या ड्रग पुरवठादारांची प्रचंड माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. त्यांची टेस्ट झाल्यास भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंह कोणाशी बोलत होता हे कळेल व भाजपाचे ड्रग माफियाशी असलेले संबंधही उघड होतील,’ असा सावंत यांनी म्हटलं आहे.

सावंत यांच्या या मागणीला कदम यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. ‘छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे. उद्या नव्हे, या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी यायला तयार आहे. माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे. मात्र, या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का? ते तपासून पहा,’ असा चिमटा कदम यांनी काँग्रेसला काढला आहे.

‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बडे नेते, अभिनेते आणि ड्रग माफिया यांना वाचवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न संपूर्ण देश व जगानं पाहिला आहे. या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली. हेच सरकारच्या जिव्हारी लागलं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here