इस्लामाबाद: आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान आता चीनच्या जाळ्यात अडकतच चालला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानचा पाय आणखीच खोलात जात आहे. पाकिस्तानने आपला समुद्रही चीनच्या ताब्यात दिल्याचे चित्र आहे. पाकिस्तानने विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी जहाजांना मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक मच्छिमारांनी आंदोलन सुरू केले आहे.

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे कराचीतील मच्छिमारांना धक्का बसला आहे. हजारो मच्छिमारांनी चीनविरोधातही आंदोलन सुरू केले. पाकिस्तान सरकारने परवानगी दिल्यामुळे चीनहून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी कराचीत मोठ्या २० ट्रॉलर दाखल झाल्या आहेत. या चिनी जहाजांना सिंध आणि बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चिनी जहाजांना पाकिस्तानमध्ये मासेमारी करू न देण्याची मागणी स्थानिक पाकिस्तानी मच्छिमारांनी केली आहे.

वाचा:

चिनी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू शकतात. त्यामुळे समुद्रातील संतुलन बिघडण्याची भीती असून पाकिस्तानच्या मच्छिमारांना त्याचा मोठा बसणार आहे. पाकिस्तानच्या फिशर फॉल्क फोरमच्या अहवालानुसार पाकिस्तानच्या किनारी भागात माशांची संख्या ७२ टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रमाणाहून अधिक मासेमारी केल्यामुळे माशांची संख्या कमी झाली आहे.

वाचा:

पाकिस्तानमध्ये जवळपास २५ लाखजणांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. हे मच्छिमार छोट्या नौकांचाही वापर करतात आणि खोल समुद्रात जाऊ शकत नाहीत. याउलट चिनी जहाज हे खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणावर मासे पकडू शकतात.

वाचा:

चीन सध्या जगभरातील सी-फूडवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने इक्नाडोर, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या किनाऱ्यावर जात मासेमारी करण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरातील एक तृतीयांश सी-फूड चीनमध्ये खाल्ले जाते. त्यामुळेच आता चीनच्या समुद्र हद्दीत माशांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच चिनी जहाजे मासेमारी करण्यासाठी इतर ठिकाणी जात आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here