पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चौघांचे प्राण वाचले.

संस्कृती सोमनाथ पवार (वय १२, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) हिचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. वेल्हे पोलिसांनी या घटनेत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

मी उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय, ते माझा मेसेज इंडियाच्या बैठकीत देतील : प्रकाश आंबेडकर
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड सिटी येथे राहणारे सोमनाथ पवार हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांसह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते. कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.

गाडी जोरात धरणात कोसळल्याने आवाज ऐकून आजूबाजूला असलेले स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यानंतर कारमध्ये असलेल्या चार ते पाच लोकांना त्यांना बाहेर काढले. पण बारा वर्षांची संस्कृती कारमध्येच अडकली होती. कार पाण्यात बुडाल्याने तिला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रात्री उशिरा कार बाहेर काढण्यात आली. त्यात संस्कृतीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणात आक्समात मृत्यूची नोंद केली आहे.

आईच्या पार्थिवाला लेकींनी खांदा दिला, घिसाडी समाजातील प्रथेला मूठमाती
पुणे-पानशेत रस्त्यावर धोकादायक वळणे व सुरक्षेबाबत उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यानंतर वाहने खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळून नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here