: डास मारण्यासाठी वापरण्यात येणारं लिक्विड चुकून प्यायल्यानं दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. चेन्नईच्या मनाली भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी माधवाराम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.बी. लक्ष्मी असं मृत चिमुकलीचं नाव आहे. लक्ष्मी तिच्या कुटुंबासह चिन्ना माथूर परिसरात वास्तव्यास होती. संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मी तिची चार वर्षीय बहीण शक्तीसोबत खेळत होती. त्यावेळी वडील बालाजी कामासाठी बाहेर गेले होते. ते पेशानं चालक आहेत. तर लक्ष्मीची आई दुसऱ्या खोलीत होती.आई हॉलमध्ये गेली तेव्हा तिला लक्ष्मीच्या तोंडात डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिक्विडची बाटली दिसली. पुढच्या काही क्षणांत तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिला तातडीनं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. डास मारायच्या मशीनमधून निघणारा धूर लक्ष्मीनं नाकावाटे शरीरात घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.’घटनेचा तपास सुरू आहे. लक्ष्मीची मोठी बहीण गतीमंद आहे. तिला घरातील वस्तू इकडे तिकडे टाकायची सवय आहे. सोमवारी लक्ष्मी आणि शक्ती खेळत असताना शक्तीनं मॉस्किटो रिपेलंट हातात घेतलं. लक्ष्मीनं तिच्या हातानं रिपेलंट स्वत:कडे घेतलं आणि ते तोंडात घातलं. रिपेलंटमधलं काही लिक्विड ती प्यायली,’ अशी माहिती पोलीस निरीक्षक एस. वेलुमणी यांनी दिली.

16 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here