मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूह पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका नवीन अहवालात कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले असून अदानी कुटुंबातील भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘अपारदर्शक’ फंडांचा वापर केला आहे, असा एका नव्या अहवालात दावा करण्यात आला आहे. ही बातमी येताच अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले आहेत.

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने गुरुवारी एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यानुसार “अपारदर्शक” मॉरिशस फंडाच्या माध्यमातून अदानी समूहाच्या काही सार्वजनिकपणे व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्स गुंतवले गेले, ज्याने अदानी कुटुंबातील कथित व्यावसायिक भागीदारांची हिस्सेदारी “अस्पष्ट” केली आहे. यानुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत समूह कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले. OCCRP ने म्हटले की गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी आणि विक्री केल्याची किमान दोन प्रकरणे आहेत, असे त्यांच्या तपासात असे उघड झाले.

अदानींचं टेन्शन वाढलं, स्वतःचेच शेअर्स गुपचूप खरेदीचा आरोप, जाणून घ्या सविस्तर तपशील
अदानी समूहाचे शेअर्स धडाम
OCCRP अहवालानंतर शेअर बाजारातील गुरुवारच्या सुरुवातीच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्ससह अदानी समूहाचे शेअर्स ४% पर्यंत कोसळले. अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे स्टॉक्स २.०२% घसरून २,४६२.९० रुपयांवर आले असताना काही रिकव्हरी करण्यापूर्वी सुरुवातीच्या सत्रात स्टॉक ४.४% पर्यंत आपटला.

अदानी पोर्ट्स १.६४% घसरून ८०५.५५ रुपयांवर आला तर अदानी पॉवर १.८४ टक्के, अदानी एनर्जी १.८७ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार देखील २.२% पर्यंत घसरले. तसेच सिमेंट उत्पादक एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स प्रत्येकी १% आणि NDTV शेअरमध्ये ०.२% पडझड झाली.

Gautam Adani News: गौतम अदानींनी पुन्हा विकले ८,७०० कोटींचे शेअर, जाणून घ्या का आली अशी वेळ
अदानी समूहाकडून आरोपांचे खंडन
दरम्यान, अदानी समूहाने एक निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळले आहेत. समूहाने म्हटले की ही सोरोसला पाठिंबा देणाऱ्या संघटनांची कृती असल्याचे दिसते. हिंडनबर्ग अहवालाचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून परदेशी प्रसारमाध्यमांचा एक भागही याला वाव देत असून हे दावे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारित आहेत.

हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० चे नुकसान
त्यावेळी DRI ने ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणे, संबंधित पक्ष व्यवहार आणि एफपीआयद्वारे गुंतवणूक या आरोपांची चौकशी केली होती. एका स्वतंत्र न्यायाधिकरणाने आणि अपीलीय न्यायाधिकरणाने पुष्टी केली की कोणतेही अति-मूल्यांकन नव्हते आणि व्यवहार कायद्यांनुसार होते. मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे हे सर्व आरोप निराधार आहेत.

(नोट: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या आर्थिक नुकसानीस महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जबाबदार राहणार नाही.)

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here