मुंबई: ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ असं ट्विट केल्यानंतर कंगनानं आणखी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘मुंबई येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा’, असं थेट आव्हान कंगनानं दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका केली होती.’मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. ‘मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,’ असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर कंगनानं कांगावा करत संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,’ असं ट्वीट तिनं गुरुवारी केलं होतं.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर राजकीय, मनोरंज आणि इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींनी कंगनावर टीका केली आहे. यानंतर आता तिनं मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच केलं आहे. अनेक लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देतायत. म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा कळवेन, कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा’, असं ट्विट करून तिनं आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत
मुंबई पाकव्याप्त वायतेय, या कंगनाच्या ट्विटला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरनं मदतान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का?, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here