तिरुअनंतपुरम: तमिळनाडूतील त्रिची विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटनं मोठी कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा डाव हाणून पाडला. गोपनीय माहितीच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटनं एका प्रवाशाला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे १४९ ग्रॅम सोनं सापडलं. त्याचं बाजारमूल्य ८.९० लाख रुपयांच्या घरात आहे.एक प्रवासी सोन्याच्या तस्करीच्या प्रयत्नात असल्याची टीप एअर इंटेलिजन्स युनिटला मिळाली होती. यानंतर एआययूच्या अधिकाऱ्यांनी संशयावरुन क्वालालंपूरहून आलेल्या प्रवाशाला रोखलं. त्याची आणि त्याच्याकडे असलेल्या सामानाची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे न्यूटेलाचे दोन डबे होते. त्यांची तपासणी केली असता सोनं सापडलं.तत्पूर्वी सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर कस्टम्सनं तीन कुवेती नागरिकांना अटक केली. त्याच्याकडे ४ हजार ग्रॅम सोनं सापडलं. त्याची किंमत २.०६ कोटी रुपये इतकी आहे. कस्टम कायदा १९६२ च्या अंतर्गत तिघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. दिल्ली कस्टमकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here