सांगली : ‘राज्यात सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्यात आहे. रुग्णांना खाटा मिळत नाहीत. पालकमंत्र्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. रुग्णालयांमधील सुविधांसाठी निधी आणण्यात पालकमंत्री अपयशी ठरले. त्यांनी तातडीने सांगलीच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि यांनी केली. जिल्ह्यात नॉनकोव्हिड रुग्णांना उपचार मिळत नसल्याने या दोन्ही आमदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून चटणी-भाकरी खात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला.

‘जिल्ह्यात ऑक्सिजन खाटांची कमतरता आहे. पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. या स्थितीत सांगतील ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यातही ते अपयशी ठरले. सांगलीसाठी निधी आणू शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. सांगलीत सर्वाधिक मृत्यूदर आहे. करोना संसर्गानंतर ते जिल्ह्यातील परिस्थिती हाताळू शकले नाहीत. या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. दुसऱ्यांदा आढावा बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्यानेही त्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ‘सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय? आढावा बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना बोलवण्याचे त्यांच्यात धाडस नाही. हे असेच सुरू राहिल्यास त्यांना जिल्ह्यात फिरणे मुश्कील होईल,’ असंही ते म्हणाले.

आमदार सदाभाऊ खोत यांनी आरोग्य यंत्रणांच्या अपयशावर बोट ठेवले. सांगली जिल्हा करोनाची स्मशानभूमी होत आहे. तपासणीचे अहवाल चार-पाच दिवस मिळत नाहीत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी घरातच जीव गेला. अशा रुग्णांची नोंद आरोग्य यंत्रणांकडे नाही. नॉनकोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही. आरोग्य यंत्रणा पूर्ण कोलमडली असून, यावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही नियंत्रण नाही. प्रशासन लोकप्रतिनिधींशी संवाद साधत नाही. निवेदन देण्यासाठी लोकप्रतिनिधींनाही जिल्हधिकारी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास प्रवेशद्वार तोडून आम्ही जिल्हधिकारी कार्यालयात प्रवेश करू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. यावेळी रयत क्रांती संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विधान परिषदेच्या आमदारांना बैठकीसाठी डावलले

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीचे निमंत्रण विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना मिळाले नाही. गेल्या महिन्यातही या दोन्ही आमदारांना बैठकीचे निमंत्रण मिळाले नव्हते. यावरून संतापलेल्या आमदारांनी पालकमंत्र्यांना जाब विचारला. सांगली जिल्हा पालकमंत्र्यांची जहागिरी आहे काय? असा सवाल आमदार पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here