लडाख : लडाख सीमेवर भारत – चीनमधील संघर्ष शीगेला पोहचलेला असतानाच रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा ‘अटल बोगदा’ जवळपास पूर्ण झालाय. या सुरुंग मार्गाच्या माध्यमातून लडाख येण्या-जाण्याचा मार्ग आता संपूर्ण वर्षभर खुला राहणार आहे. चीनशी सुरु असलेल्या संघर्षा दरम्यान सैनिकांसाठी मोठा उपयोगी ठरणार आहे. कारण सेनेचे हत्यारं आणि इतर सामान आता वर्षभरात कोणत्याही वेळेत सहजच पोहचवले जाणं शक्य झालंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबर रोजी अटल बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. १० हजार फूट उंचीवर स्थित हा जगातील सर्वात लांब ९ किलोमीटरच्या या बोगद्याचं काम आता जवळपास पूर्ण झालंय. या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास १० वर्षांचा कालावधी लागला. परंतु, त्यामुळे आता वर्षभर लेह-लडाख भागाला जोडलेला राहील. सोबतच मनाली ते किलाँग या दरम्यानचा जवळपास ४६ किलोमीटरचं अंतर यामुळे कमी झालंय. सध्या मनाली ते किलाँग हा जवळपास ११५ किलोमीटरचा प्रवास आहे.

आत्तापर्यंत थंड वातावरणात बर्फामुळे अनेकदा बंद होऊन येण्या-जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होत असत.

अटल बोगदा ९ किलोमीटर लांब असून १० मीटर रुंद आहे. रोहतांग बोगद्याचं अंतर आता अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करणं शक्य झालंय. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’नं उभारलेल्या अटल बोगद्याचे चीफ इंजिनिअर ब्रिगेडियर के पी पुरुषोथमन यांनी एका चॅनलशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिलीय.

वाचा :

वाचा :

अटल बोगद्याची वैशिष्टे…

– अटल बोगद्यातून ३००० कार किंवा १५०० ट्रक एकाच वेळी प्रवास करू शकतील.

– अटल बोगदा बनवण्यासाठी तब्बल ४,००० कोटी रुपयांचा खर्च आलाय.

– बोगदा बनवण्यासाठी ‘ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड’चा वापर करण्यात आलाय. बोगद्यात हवा खेळत राहण्यासाठीही याचा वापर झालाय.

– बोगद्यात प्रत्येक १५० मीटरवर टेलिफोन, ६० मीटरवर फायर हायड्रेन्ट आणि प्रत्येक ५०० मीटरवर इमर्जन्सी दरवाजे लावण्यात आलेत.

– यू टर्न घेण्यासाठी २.२. किलोमीटरनंतर टर्निंग पॉईंट देण्यात आलाय.

– प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत तर प्रत्येक १ किलोमीटरच्या अंतरावर एअर क्वालिटी सिस्टम लावण्यात आलेत.

– हिमस्खलन आणि बर्फाचा अटल बोगद्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आलीय.

– या बोगद्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात सहजगत्या वाहतूक करणं शक्य होणार आहे.

– बोगद्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचा वेग आणि अपघातांवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे.

– या बोगद्याच्या आतून कोणतंही वाहन जास्तीत जास्त ८० किलोमीटर प्रतितास वेगानं प्रवास करू शकेल

– हा बोगदा उभारण्याच्या कामाला २८ जून २०१० रोजी सुरुवात करण्यात आली होती.

– सीमेवर रस्त्याची आणि इतर बांधकामं पूर्ण करण टबॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’नं (BRO) या बोगद्याचं कामही यशस्वीरित्या पूर्ण केलंय.

– यासाठी बीआरओच्या इंजिनिअर आणि कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागलीय. कारण थंडीच्या दिवसांत या भागात उणे ३० डिग्रीपर्यंत तापमान खाली जातं. या परिस्थितीतही बीआरओच्या जवानांनी हे काम पूर्ण केलंय

चीनसोबत तणावग्रस्त परिस्थिती असताना अटल बोगदा आणखी महत्त्वाचा ठरणार आहे. लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी सहजगत्या संपर्क साधता येणं यामुळे शक्य होणार आहे. कोणत्याही प्रकारचं सामान, हत्यारं त्यांना वेळेवर पुरवण्यासाठी हा बोगदा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातली लाहौल स्पीतिचा प्रवासही सोपा होणार आहे. कारण हाच बोगदा कुल्लू जिल्ह्यातील मनालीहून लाहौल स्पीति जिल्ह्याला जोडणार आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here