दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एलाईट चौक परिसरात आज (एक सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

शुभम रमेश लेचरूड, (वय- २३, रा. डाळिंब ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ड्युटीवर जातानाच पोलिसाला हार्ट अटॅक, ऐन रक्षाबंधनाला चार बहिणींचा लाडका भाऊ कालवश
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा आपल्या दुचाकीवरून घरी डाळिंब या ठिकाणी निघाला होता. यावेळी भरधाव आलेल्या कंटेनर चालकाने शुभम चालवीत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये शुभम याच्या डोक्याला जबर मार लागला होता.

माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप
त्याला तात्काळ उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याची माहिती दिली.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रमेश गायकवाड व राजेश दराडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताचा लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला बघ्यांनी गर्दी केली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here