मुंबई : आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढउतार होत असतात. आज मार्केट वर चढले तर उद्या खालीही येऊ शकते. बाजाराच्या मोठ्या चढउतारात देखील बाजार तज्ज्ञांनी विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला असून हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये अदानी समूहातील एसीसी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, आयटीसी, IDFC फर्स्ट बँक, हवेल्स इंडिया, वोल्टासच्या शेअर्सचा समावेश आहे.

एसीसी
शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी एसीसीच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला असून यासाठी प्रति शेअर लक्ष्य २१८० रुपये देत ब्रोकरेजने शेअर्ससाठी १९४५ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. तर १ सप्टेंबर रोजी ACC शेअर १,९९८.८५ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

देशातील बड्या ऑटो कंपनीचा नवा पराक्रम, शेअरची किंमत भिडली गगनाला; पाहा आता पुढे काय करावं
LIC हाऊसिंग फायनान्स

शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला देत प्रति शेअर लक्ष्य ४५२ रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी ४१० रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. १ सप्टेंबर रोजी हा शेअर ३२८ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

आयटीसी (ITC)
शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी आयटीसीच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ३२० रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी ४५३ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 1 सप्टेंबर रोजी हा शेअर ४४१ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

पैसे छापण्याची मशीन! फारशी चर्चा न झालेला टाटांचा छुपारुस्तम शेअर, हजार गुंतवणाऱ्यांनी लाखो कमावले
IDFC फर्स्ट बँक
शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी आयडीएफसी फर्स्ट बँकच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य १०८ रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी ८८ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. तर १ सप्टेंबर रोजी IDFC फर्स्ट बँकेचा शेअर ९० रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

हवेल्स इंडिया
शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी हवेल्स इंडियाच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य १४४० रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी १३५५ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. १ सप्टेंबर रोजी हा शेअर १३८५ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

मालामाल शेअर! एनर्जी क्षेत्रातील कंपनीचा शेअर आता रॉकेट होणार, तपशील वाचून पैसे गुंतवा
वोल्टास
शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी हवेल्स इंडियाच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य ९२० रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी ८३५ रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. १ सप्टेंबर रोजी हा शेअर ८७२ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.

(Disclaimer: तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here