“आम्ही SUIT द्वारे मिळवत असलेला डेटा चांगला आहे आणि आम्ही स्वतःसाठी ठरवलेल्या उच्च दर्जाच्या मानकांची तो पूर्तता करतो आहे, याचं जोपर्यंत समाधान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”, असं ५२ वर्षांच्या रामप्रकाश यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. आमच्यासाठी आणि अनेक प्रतिभावान आणि अनेकांसाठी हा थोडा चिंतेचा काळ आहे. ज्यांच्यासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम केले आहे. पण, एक गोष्ट निश्चित आहे, SUIT जे नवीन विज्ञान तयार करणार आहे ते आश्चर्यकारक असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
फोटोस्फियर प्रदेशात तापमान ३,७०० ते ६,२०० डिग्री सेल्सियस दरम्यान असते. सूर्याच्या चार बाह्य स्तरांपैकी दोन, सौर फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरची प्रतिमा अल्ट्राव्हायोलेट श्रेणीमध्ये बनवणे हे SUIT चे उद्दिष्ट आहे. फोटोस्फिअर बाह्य स्तरांचा सर्वात आतील आणि शेवटचा थर जो थेट दृश्यमान असतो. या प्रदेशातील तापमान ३,७०० ते ६,२०० डिग्री सेल्सियस असते. क्रोमोस्फियर हा फोटोस्फियरच्या अगदी वरचा प्रदेश आहे. येथील तापमान ३,७०० ते ७,७०० अंश सेल्सिअसपर्यंत असते.
मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनच्या मणिपाल सेंटर फॉर नॅचरल सायन्सेसचे सहाय्यक प्राध्यापक, श्रीजित पदिनहत्तेरी म्हणाले, “प्रक्षेपणानंतर (शनिवारी) जे होणार आहे तो सुमारे चार महिन्यांच्या कक्षेत हस्तांतरण आणि लॅग्रेंगियन पॉइंट L1 पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे, त्यानंतर हॅलो वर्गात प्रवेश करेल. तिथे पोहोचल्यावर, SUIT सह पेलोड सक्रिय होईल.” SUIT साठी प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून काम करत असलेले श्रीजीथ २०१७ मध्ये SUIT च्या विकासात IUCAA टीममध्ये सामील झाले होते.
ते म्हणाले, “दूषित नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यकतेमुळे अतिनील दुर्बिणी विकसित करणे नेहमीच आव्हानात्मक असते. धूळीचा अखादा कण किंवा तेलाच्या रेणूचा किंवा इतर कोणत्याही अस्थिर सेंद्रिय घटकाचा एक कण देखील दुर्बिणीची कार्यक्षमता बर्याच प्रमाणात कमी करू शकतो आणि म्हणूनच आपण नेहमी पूर्णपणे झाकलेले, दुहेरी थरांचा कोट घालून अत्यंत स्वच्छ प्रयोगशाळांमध्ये काम करावं लागतं.”
२०१३ पासून SUIT वर काम करत असलेल्या दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितलं की, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे चालवले जाणारे हे या प्रकारचे पहिले मिशन आहे, त्यामुळे उपकरणे तयार करण्यासाठी थोडा वेळ लागला. तांत्रिकदृष्ट्या हे एक अत्यंत आव्हानात्मक मिशन आहे आणि कोव्हिड महामारीच्या काळात या कामाची गती मंदावली असली तरी लवकरच कामाला गती मिळाली. आम्ही गेली १०-१२ वर्षे SUIT विकसित करण्यावर काम करत आहोत”.