बोईसर:
पालघर जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट झाला. शनिवारी सायंकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात ८ जण मृत्युमुखी पडले आहेत तर काही जण भाजले आहेत. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे. स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

बोईसर औद्योगिक वसाहतीमधील एम-२, या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा कारखाना या पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखला जात होता, या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत देखील कोसळी आहे, या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज २२ ते २५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. स्फोटाचा कारण अद्याप कळू शकलेलं नाही. स्फोटामुळे लागलेली आग आसपासच्या दोन-तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. मृतांमध्ये, कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांचाही समावेश आहे. तारापूर गावातील कोलवडे गावात ही कंपनी आहे. कंपनीचं नाव ‘तारा नायट्रेट’ आहे. काही कामगार अद्याप इमारतीखाली दबले असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचे बचाव कार्य सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here