Mumbai News: घोडबंदर रोड येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

घोडबंदर भागात राहणाऱ्या प्रियंका मोहिते वय २६ हिने मुलगी ध्रुवी वय १ वर्ष हिच्यासोबत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघींचाही मृत्यू झाला. पतीने तिला सातारा येथील बहिणीला भेटण्यासाठी पाठवले नाही. घरातील किरकोळ कारणावरुन वादही झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांची माहिती दिली. प्रियंका मोहिते घोडबंदर रोड, कासारवडवली येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती. तिने मुलीसह घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. दोघींनाही तात्काळ रुग्णवाहिकेमधून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.