मुंबईः गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वेनं लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी, मनसे नेते यांनी केली आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर आता गंभीर रुग्णांनाही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘गेल्या सहा महिन्यांच्या करोना लॉकडाऊनच्या काळात क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजारानं त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. सहा महिन्यांत सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबर प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे,’ असं अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

‘असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनानं प्रवास परवडत नाही. या खर्चामुळं अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळं अशा रुग्णांचा मृत्यू दर करोनामुळं होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक होत चालला आहे, तसंच, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकाची गरज असते. अशावेळी रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्यानं त्यांना रेल्वेनं प्रवासासाठी मुभा देणं गरजेचं आहे,’ असं देखील या पत्रात म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here