जळगाव: शहरातील मयूर कॉलनीमधील दुर्गेश भरत बारी (२०) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. वडील कामावर, आई नातेवाईकांकडे आणि बहीण क्लासला गेलेली होती. बहीण क्लासवरून घरी परतली तेव्हा दरवाजा उघडतात तिला घरात भावाने गळफास घेतलेला दिसला. त्यानंतरच ही घटना समोर आल्याची माहिती मिळाली आहे.
रक्षाबंधनासाठी नणंदेकडे आली; पतीसोबत वाद, पत्नीचा टोकाचा निर्णय अन् पोटच्या लेकराचा नाहक बळी
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रहिवासी असलेले भरत बारी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या पिंप्राळामधील मयूर कॉलनीमध्ये राहतात. भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी ते रिक्षा चालवितात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेलेले होते. त्यांच्या पत्नी कविता या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर त्यांची मुलगी नंदिनी ही क्लासला गेलेली होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा दुर्गेश हा घरात एकटाच होता. घरात कोणीही नसताना त्याने छताला गळफास घेतला आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास क्लासला गेलेली नंदिनी ही घरी आली त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. तिने आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मुलगी पळून गेल्यानं आई-वडिलांची आत्महत्या, नातेवाईकांकडून प्रियकराच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी दुर्गेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुर्गेशचे वडील भरत बारी हे सामाजिक कार्यात सक्रीय असून बारी समाजाच्या विविध कामासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. भरत बारी यांना दुर्गेश हा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दुर्गेशने आयटीआय केले असून तो मिळेल ते काम करीत होता. दुर्गेशने आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला. घटनेची माहिती मिळाल्यावर रुग्णालयात दुर्गेशच्या नातेवाईक, मित्रांची गर्दी झाली होती. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here