नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार यांनी वाढती बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधलाय. ‘१२ कोटी नोकऱ्या संपल्यात, देशातून उल्हासाचं वातावरण आणि सुरक्षा गायब झालीय, प्रश्न विचारले तर त्याचेही उत्तर मिळणार नाहीत’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. तरुणांच्या समस्यांचं उत्तर शोधा, उपलब्ध करा आणि परीक्षांचे निकाल जाहीर करा, अशा मागण्याही त्यांनी समोर ठेवल्या.

‘गावात काम नाही, ऑगस्टमध्ये देशात वाढलीय’ अशा आशयाची एक बातमी शेअर करत राहुल गांधी लिहितात, ‘रोजगार, पुननिर्माण, परीक्षांचे निकाल, देशातील तरुणांच्या समस्येवर उत्तरं काढा’

वाचा :

वाचा :

याच मुद्यावरून काँग्रेसच्या महासचिव यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधलाय. ‘२०१७ एसएससी सीजीएल भर्तीत दाखल झालेल्यांची नियुक्ती अद्यापही झालेली नाही. २०१८ – सीजीएलच्या परीक्षा झालेल्या नाहीत. २०२० – एसएससी सीजीएसच्या भर्तीच झालेल्या नाहीत… भर्ती झाल्या तर परीक्षा नाही, परीक्षा झाल्या तर निकाल नाही, निकाल आले तर नियुक्त्या नाहीत’ असं म्हणत ओढत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत.

खासगी क्षेत्राला धक्का आणि सरकारी भर्तीमध्ये टाळं लावल्यानं तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त होतंय परंतु, सरकार सत्यावर पडदा टाकण्यासाठी जाहिराती आणि भाषणांमधून खोटी माहिती देतंय, असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here