मुंबईः मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते? असं वक्तव्य करणाऱ्या कंगनाविरोधात सर्व स्तरातून टीका होत असताना राष्ट्रवादीचे आमदार यांनीही कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. मुंबईविरोधात स्ंटटबाजीसाठी बोललेलं खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात रोहित पवार यांनी कंगनाला समज दिली आहे.

शिवसेना नेते यांना प्रत्युतर देताना कंगनानं एक ट्विट केलं होतं. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं ट्विट केलं होतं. यानंतर राजकिय नेत्यांसह कलाकारांनीही कंगनाविरोधात तोफ डागली होती. त्यानंतर कंगनानंही मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान दिलं आहे. यावरून वातावरण अधिक तापलं आहे. शिवसेना महिला आघाडीनं कंगनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात कंगनाविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. रोहित पवार यांनीही कंगनाला सूचक शब्दात सुनावले आहे.

‘देशाला अर्थपुरवठा करणाऱ्या सर्व जाती- धर्म व भाषेतील लोकांना सामावून घेणाऱ्या आणि पुष्कळ जणांच्या जीवनाला अर्थ मिळवून देणाऱ्या मुंबईविषयी व्यर्थ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मुंबई व महाराष्ट्राच्या विरोधात स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही,’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाचे कान टोचले आहेत. मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. हे वचन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी ट्विटरवरून कंगनावर निशाणा साधला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here