नवी मुंबई: वाशी मधील जूहगाव येथील एका हॉटेलमधून सहा नायजेरियन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिला ड्रग्स विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांच्या टीमने धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी ड्रग्स हस्तगत केले असून नायजेरियन महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले आहे. अनेक दिवसांपासून परिसरात या महिलांचा वावर होता. तरुण-तरुणींना ड्रग्स पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सदर कारवाई उपायुक्त विवेक पानसरे आणि वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबईत सर्वत्र बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात शुक्रवारी दुपारपासून धाडसत्र सुरु केले आहे. ज्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे अशा सर्वांची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी १५ पेक्षा अधिक विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यात सर्वाधिक नागरिक हे आफ्रिका खंडातील देशांचे आहेत.

जालन्यात पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक, आंदोलक अन् पोलीस जखमी

नवी मुंबईत राहणारी मात्र ज्यांची व्हिसा मुदत संपली आहे अशा सर्व संशयित लोकांना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वत्र धाडसत्र सुरु केले आहे. वाशीतील जुहू गाव, जुहू गाव खाडी परिसर, बोनकोडे खैरणे गाव तसेच पनवेल खारघर परिसरातील शहरापासून नजीक असलेली गावे येथे शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या मध्ये वाशीतील जुहू गाव येथे पाच नायझेरिया देशाच्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरत्र १० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.

अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांच्या विविध ठिकाणी छापे टाकले.
६०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि जवानांनी शोध आणि जप्ती मोहिमेत भाग घेतला असून आतापर्यंत ७५ परदेशी नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग तसेच त्यांची राष्ट्रीयत्वे तपासली जात आहेत. अंमली पदार्थ शोध आणि जप्तीची कारवाई अजूनही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ७०० ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅमपेक्षा जास्त MD, ३०० किलो ट्रामाडॉल हायड्रोक्लोराइड जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.

जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना संपवलं, नंतर कुख्यात डॉनला मारलं; तिहेरी हत्याकांडाने जळगाव हादरलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here