नवी दिल्ली : जगातील अतिश्रीमंत एलन मस्क यांच्या जीवनावर आधारित पुस्तकात अनेक गौप्यफोट करण्यात आले आहेत. X (यापूर्वी ट्विटर) सीईओ एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही कारणावरून चर्चेत राहतात, पण यावेळी ते आपल्या मुलीसाठी चर्चेत आले आहेत. २१ सप्टेंबर रोजी मस्कची बायोग्राफी लाँच केली जाणार असून यामधील काही भाग वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. आपल्या बायोग्राफीमध्ये मस्क यांनी असे काही शेअर केले आहे ज्यामुळे तुमच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

झुकरबर्गने खेळला आणखी एक गेम, Twitter चं खास फीचर आता थ्रेड्समध्ये
एलन मस्क आणि मुलीचे नातेसंबंध
एक्स सीईओ एलन मस्कची मुलगी यापूर्वी त्यांचा मुलगा होता हे बहुतेकांना माहित असेल. म्हणजे तिने लिंग बदल ऑपरेशन केले असताना तिने आपल्या आपल्या वडीलांसोबतच्या नातेसंबंधांवर पाणी सोडले आणि आपल्या नावातून मस्क आडनावही काढून टाकले आहे. मस्कच्या मुलाचे नाव झेवियर अलेक्झांडर होते, जो आता व्हिव्हियन जेना विल्सन म्हणून ओळखला जातो. मस्क यांनी आपण सुरुवातीपासून आपल्या मुलीच्या लिंग बदलाच्या निर्णयाच्या समर्थानात असल्याची कबुली दिली, पण त्याचबरोबर आपल्या मुलीसह नात्यात शाळेमुळे कटुता आल्याचाही त्यांनी दावा केला.

व्हिव्हियन जेना विल्सनने कॅलिफोर्नियामधील सांता मोनिका येथील क्रॉसरोड स्कूल फॉर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये शिक्षण घेतले ज्याचे प्रति वर्ष ५० हजार डॉलरपर्यंत आहे. व्हिव्हियन मस्कची कॅनेडियन पत्नी जस्टिन विल्सनची मुलगी असून तिला ग्रिफिन नावाचा एक जुळा भाऊ देखील आहे. विवियनचा जन्म २००४ मध्ये झाला होता तर जस्टिन आणि एलन मस्कचा २००८ मध्ये घटस्फोट झाला.

Twitter News : ट्वीटरमुळं एलन मस्क तोट्यात, दर महिन्याला होतंय १००० कोटींचं नुकसान
अयशस्वी प्रयत्न
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एलन मस्क यांनी व्हिव्हियनला बदलण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मस्क म्हणाले की, “मी आमचे नाते सुधारण्यासाठी अनेक तडजोडी केल्या पण तो माझ्यासोबत वेळ घालवण्यास तयार नव्हता. ती समाजवादाच्या पलीकडे गेली होती आणि पूर्ण कम्युनिस्ट बनली होती व प्रत्येक श्रीमंत माणूस वाईट असतो असे तिला वाटू लागले होते.” तसेच व्हिव्हियनशी त्यांचे संबंध तिच्या प्रतिकूल स्वभावामुळे बिघडले, हे देखील मस्कने मान्य केले.

Throwback: सावत्र मुलीशी शरीरसंबंध, दोन अपत्य; एलन मस्कच्या वडिलांनी दिलेली धक्कादायक कबुली​​
२०२३ मध्ये सर्वकाही बदलले
एलन मस्क यांचा मुलगा झेवियरने १८ एप्रिल २०२३ रोजी लिंग बदलून मुलीचे नाव बदलण्यासाठी अमेरिकन कोर्टात याचिका दाखल केली होती. झेवियरने आपले नाव बदलून विवियन जेना विल्सन ठेवण्यासाठी आणि नवीन जन्म प्रमाणपत्र जारी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असून कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत झेवियरने तिचे वडील एलन मस्कशी सर्व संबंध तोडण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिला तिच्या जैविक वडिलांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here