नवी दिल्ली : भारतीय राजनाथ सिंह ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आपले समकक्ष – () यांची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. रात्री ९.३० वाजता ही भेट होणार आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियात होणारी भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

याअगोदर चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे शुक्रवारी बैठकीसाठी वेळ मागितली होती. भारताकडून यावर कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नव्हतं. परंतु, आता मात्र ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

या अगोदर राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू (General Sergei Shoigu) यांची भेट घेतली होती.

‘चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर’

पूर्व लडाखमधील चीन सीमेवरील परिस्थिती थोडीशी नाजूक आणि गंभीर असल्याचं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी म्हटलं. मात्र, लष्कराने उचललेल्या खबरदारीच्या पावलांमुळे ही परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषवरील तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल नरवणे गुरुवारी लेहमध्ये, तर शुक्रवारी लडाखचा दौरा केला. दोन दिवसांच्या या दौऱ्याबाबत माहिती देताना त्यांनी, ‘सीमेवरील सद्यस्थिती काहीशी नाजूक आणि गंभीर आहे. पण, आम्ही त्याबद्दल विचार करत आहोत. सैन्याच्या सुरक्षेसाठी आम्ही काही सावधगिरीची पावले उचलली आहेत आणि आम्हाला खात्री आहे की परिस्थिती नियंत्रणात येईल. काल लेह दौऱ्यावर असताना, मी विविध ठिकाणांना भेट दिली आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. आपल्या जवानांचे आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खंबीर आहे आणि ते कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहेत. मी असं म्हणेन की आपले जवान सर्वोत्तम आहेत’ असं म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here