मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करण्याचे आकर्षण बहुतेक लोकांमध्ये असते, परंतु बाजारातील चढउताराचे जोखीम लक्षात घेत अनेक जण संकोच करतात. देशांतर्गत शेअर बाजारात टाटा समूहाचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या पसंतीचे असतात. देशातील बड्या उद्योग समूहाच्या बऱ्याच कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला असून त्यापैकी एका कमी चर्चा होत असलेल्या टाटा समूहाच्या स्टॉकबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

टाटांचा कमी चर्चित स्टॉक
शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी टाटा समूहाची कंपनी टाटा कॉफीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. परिणामी स्टॉकने बाजारात ५२ आठवड्याची सर्वोच्च उच्चांक नोंदवला. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर तीन टक्क्यांनी उडी घेत २५८.८० रुपयांवर पोहोचला तर २५१.४० रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप ४,६९५.४१ कोटी रुपये आहे, म्हणजे टाटा कॉफी स्मॉल कॅप श्रेणीतील स्टॉक आहे.

शेअर मार्केटमधून करा कमाई, ‘हे’ स्टॉक्स अल्पावधीत देऊ शकतील मजबूत नफा; डिटेल्स नोट करा!
टाटा कॉफी शेअरचा परतावा
गेल्या दोन वर्षांच्या परताव्यावर नजर टाकली तर टाटा कॉफीच्या शेअर्समध्ये मंदी राहिली. मुंबई शेअर बाजार म्हणजे BSE वरील सेन्सेक्सच्या तुलनेत वेगवेगळ्या कालावधीत स्टॉक २०% पेक्षा जास्त मुसंडी मारू शकला नाही. तर मागील सहा महिन्यात शेअरने २०% रिटर्न दिले आहेत. त्याच वेळी वर्षभराच्या आधारावर टाटा कॉफी शेअरने सुमारे १६% सकारात्मक परतावा दिला आहे.

करोडपती करणारा मालामाल शेअर! कवडीमोल भावात मिळणाऱ्या स्टॉकने दिला हजारो पट परतावा, पाहा डिटेल्स
टाटा कॉफी जून तिमाहीचे निकाल
अलीकडेच टाटा कॉफीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले ज्यात कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. टाटा कॉफीच्या तिमाही निकालानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५% घट होऊन ६२.०६ कोटी रुपये राहिला जो वर्षभरापूर्वी याच कालावधीत नफा ६५.४० कोटी रुपये होता. तथापि, भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांत कॉफी व इन्स्टंट कॉफी व्यवसायात वाढ झाल्याने टाटा कॉफीचे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६६६.०५ कोटींवरून वाढून ७०७.९३ कोटी रुपये झाले आहे.

पैसाच पैसा! कंगाल करणारा शेअर तेजीच्या लाटेवर स्वार, गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ ‘हिरवेगार’
टाटा कॉफीबद्दल जाणून घ्या…

टाटा कॉफी लिमिटेड ही टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची उपकंपनी आहे, जी पूर्वी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड म्हणून ओळखली जायची. ही आशियातील सर्वात मोठी कॉफी कंपनी असण्याबरोबर झटपट कॉफीची दुसरी सर्वात मोठी निर्यातदार आणि भारतातील विशेष कॉफीची आघाडीची कंपनी आहे. कंपनी दक्षिण भारतात ८ हजार ते १० हजार टन अरेबिका व रोबस्टा कॉफीचे उत्पादन करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here