यावर्षी आयपीएलला १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वी खेळाडूंना एका गोष्टीची नितांत गरज आहे, असे मत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी महान क्षेत्ररक्षक जॉंटी रोड्स यांनी सांगितले आहे.

वाचा-

करोना व्हायरसमुळे खेळाडू मार्च महिन्यापासून आपल्या घरीच होते. जवळपास पाच महिने खेळाडू सरावासाठीही मैदानात उतरले नव्हते. आता फक्त काही दिवसांपूर्वीच खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी थेट आयपीएलचे सामने खेळले तर ते योग्य ठरणार नाही, असे जॉंटी यांनी सांगितले आहे.

वाचा-

जॉंटी पुढे म्हणाले की, ” सध्याच्या घडीला खेळाडू हे काही दिवसांपासून सराव करायला लागले आहेत. गेले ४-५ महिने ते आपल्या घरामध्येच होते. त्यामुळे थेट ते आयपीएलचे सामने खेळायला मैदानात उतरले तर ते योग्य ठरणार नाही. त्यासाठी आयपीएलपूर्वी खेळाडूंना सराव सामन्यांची गरज आहे. खेळाडूंना जर सराव सामने मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण बऱ्याच महिन्यांपासून खेळाडू एकही सामने खेळेलेले नाहीत. सराव करणे ही एक वेगळी गोष्ट असते आणि मैदानात कामगिरी करणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे जर सराव सामना खेळवला गेला तर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढायलाही मदत होईल.”

वाचा-

ते पुढे म्हणाले की, ” सध्याच्या घडीला सर्व खेळाडू हे बायो बबल सुरक्षा कवचामध्ये राहत आहेत. त्याचे नियम कडक आहेत आणि ते पाळायलाच हवेत. पण मला वाटतं की बायो बबलपेक्षा आयपीएलपूर्वी खेळाडूंना सराव सामना मिळणेदेखील महत्वाचे आहे. कारण खेळाडूंना जर सराव सामना मिळाला तर सर्वांनाच आपला अंदाज येऊ शकतो. कोणता खेळाडू किती फिट आहे आणि तो कशी कामगिरी करू शकतो, याचा अंदाज सराव सामन्यातून येतो. त्यामुळे माझ्यामते खेळाडूंसाठी सराव सामना हा महत्वाचा ठरू शकतो.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here