नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून पूर्व लडाख भागापासून अरुणाचल पर्यंत सीमावर्ती भागात भारत आणि चीन दरम्यान तणावाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय राजनाथ सिंह () आणि चीनचे चीनचे संरक्षण मंत्री (Wei Fenghe) यांची रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये भेट झालीय. संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आलीय. संरक्षण मंत्री सध्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी चीनचे आपले समकक्ष वेई फेंगे यांची मॉस्कोमध्ये भेट घेतलीय.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बुधवारी भारतातून रशियाला रवाना झाले होते. आठ सदस्य देशांचा समावेश असलेली शांघाय को-ऑप ऑर्गनायझेशनची बैठक शुक्रवारी पार पडली. या परिषदेला चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक हेदेखीलउपस्थित होते. अगोदर राजनाथ सिंह यांचा पाकिस्तान किंवा चीनशी कोणत्याही द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रम आखलेला नव्हता.

तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे शुक्रवारी बैठकीसाठी वेळ मागितली होती. भारताकडून यावर कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नव्हतं. परंतु, आज मात्र ही बैठक निश्चित करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९.३० वाजता राजनाथ सिंह आणि जनरल वेई फेंघे यांची भेट झाली.

संबंधित बातम्या :वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here