पलिक्कल : भारताचा डाव संपला आणि जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे जर हा सामना २० षटकांचा खेळवला गेला तर पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट मिळू शकते, हे आता समोर आले आहे. प्रत्येक पाच षटकं कमी होत गेली तर किती धावांचे पाकिस्तानला टार्गेट मिळेल, याचे समीकरण आता समोर आले आहे.भारताने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावा केल्या. त्यामुळे जर ५० षटकांत खेळ झाला तर पाकिस्तानला २६७ धावा कराव्या लागतील. पण पावसामुळे ५० षटकांचा खेळ होईल, असे आता दिसत नाही. त्यामुळे जर हा सामना ४५ षटकांता खेळवण्यात आला तर पाकिस्तानला विजयासाठी २५४ धावांचे टार्गेट दिले जाऊ शकते. पण जर पावसामुळे १० षटकांचा खेळ वाया गेला आणि जर ४० षटकांचा सामना खेळवण्यात आला तर पाकिस्तानला या ४० षटकांमध्ये २३९ धावा कराव्या लागतील. पण जर पावसामुळे २० षटकांचा खेळ वाया गेला, तर ३० षटकांचा हा सामान खेळवला जाईल. जर हा सामना ३० षटकांचा खेळवला गेला तर पाकिस्तानला विजयासाठी २०३ धावांचे टार्गेट देण्यात येईल. पण पाऊस सुरुच राहीला आणि हा सामना २० षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला तर त्यासाठी पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट देण्यात येईल, हेदेखील आता ठरवण्यात आले आहे. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना जर २० षटकांचा खेळवण्यात आला तर पाकिस्तानला विजयासाठी १५५ धावांचे टार्गेट देण्यात येईल. त्यामुळे जशी षटकं कमी होतील, तसे टार्गेटही कमी होणार आहे. त्यामुळे आता किती षटकांचा खेळ होतो, यावर पाकिस्तानला नेमकं किती धावांचे टार्गेट मिळते, हे अवलंबून असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाने खेळ खंडोबा केला आहे. त्यामुळे जशी षटकं कमी होतील, तशा धावाही कमी होती आणि हे पाकिस्तानच्या पथ्यावर पडू शकतं. त्यामुळे आता मैदानातील पंच किती षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here