कोल्हापूरः केवळ आपला जन्म गावालाच नव्हे तर परिसरातील पंधरा-वीस गावांच्या सेवेसाठी असं म्हणत रुग्णवाहिका देताना पोलीस खात्यातील ‘भगवान’ च जणू ग्रामस्थांच्या मदतीला धावला. कराडचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हे आगळेवेगळे काम करून केवळ पोलिस दलासमोरच नव्हे तर इतर सर्वच दानशूर व्यक्ती समोर नवा आदर्श ठेवला आहे.

करवीर तालुक्यातील मांढरे हे पाटील यांचे गाव. कोल्हापूर पासून वीस किलोमीटर असलेले हे गाव. गावात एखादी घटना घडली आणि रुग्णाला तातडीने उपचारासाठी कोल्हापूरला न्यायचं असेल तर कोल्हापुरातून रुग्णवाहिका यायला तास-दीड तास जायचा. तोपर्यंत त्या रुग्णाची प्रकृती अधिकच बिघाडायची. यामुळे आपल्या मांढरे या जन्मगावी एखादी रुग्णवाहिका असावी, त्याचा वापर परिसरातील पंधरा- सोळा गावांना व्हावा असे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मनात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केली.

एक रुग्णवाहिका घेऊन ती गावाला अर्पण केली आहे. त्याचा खर्च तेच करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडे काहींची प्रकृती अचानक बिघडली तर अशावेळी रुग्णवाहिका अत्यंत गरजेचे असते. अशी रुग्णवाहिका गावात असावी म्हणून पाटील यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली आणि आज ही रुग्णवाहिका गावात पोहोचवली देखील. पाटील हे सध्या कराड येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले आणि रुग्णवाहिका मांढरे या गावी रवाना झाली.

एखाद्या व्यक्तीने मनात आणले तर गावासाठी काय करु शकतो हे पाटील यांनी दाखवून दिले आहे. या पद्धतीने इतरांनी गावागावात जर रुग्णवाहिका दिली तर रुग्णांचा प्रश्न मिटणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here