मुंबई : अंधेरी पूर्व ते विमानतळ, अशा भूमिगत मेट्रोचे भुयारीकरण मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले आहे. ‘मेट्रो-७ अ’ नावाची ही तीन किमी मार्गिका पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन आहे.

महामुंबई प्रदेशात वेगवेगळ्या अशा १४ मेट्रो मार्गिकांचे नियोजन आहे. त्यापैकी तीन सुरू झाल्या आहेत, तर सात मार्गिकांची उभारणी सुरू आहे. त्यातील सातवी मार्गिका अंधेरी पूर्व (गुंदवली) ते छत्रपती शिवाज महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल २) अशी आहे. तिचे प्रत्यक्ष काम शनिवार, २ सप्टेंबरला सुरू झाले. ‘एमएमआरडीए’ने ‘एक्स’वर व्हिडीओद्वारे ही माहिती दिली.

आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे मराठा संघटना आक्रमक, देवेंद्र फडणवीसांविरोधात प्रचंड रोष , फोटो जाळला
ही मार्गिका एकूण ३.१७५ किमी लांबीची असेल. त्यापैकी २.४९ किमी भूमिगत असेल. मार्गिकेच्या या भागासाठी बोगदा खणण्यास सुरुवात झाली आहे. विमानतळाच्या टर्मिनल-२समोरील भागातून तो खणला जात आहे. दुसऱ्या बाजूकडील उन्नत भाग काही प्रमाणात तयार आहे. विमानतळ, विमानतळ वसाहत (अंधेरी) व अंधेरी पूर्व (गुंदवली), अशी तीन स्थानके यावर असतील. विमानतळ टर्मिनल-२ येथे ही मार्गिका मेट्रो-३ (आरे ते कफ परेड) या अन्य भूमिगत मार्गिकेला संलग्न होईल, तर अंधेरी पूर्व येथे ही मार्गिका मेट्रो-७ला संलग्न होणार आहे. ‘शनिवारी भुयारीकरण सुरू झाल्यानंतर मे २०२४ पर्यंत ही मार्गिका पूर्ण करण्याचे नियोजन आहे’, असे ‘एमएमआरडीए’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here