मुंबईः मुंबईची तलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सध्या टीकेचं लक्ष्य ठरली आहे. रजकीय नेत्यांनी व कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. तर, कंगनानंही मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असं ट्विट करत वाद वाढवला होता. कंगनाच्या विधानाचा निषेध म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगना रणौटच्या पुतळ्याला चप्पलांचा चोप देत आंदोलन केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी मात्र या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आहे. शिवसेनेला दिलेल्या थेट आव्हानामुळं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांनी कंगनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील ठिकठिकाणी कंगनाचे पुतळे जाळून व पोस्टरवर चप्पलांचा चोप देत आपला निषेध व्यक्त केला होता. यावरूनच अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्यांचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत राहतील, पण पोस्टरला चप्पलांनी मारणं हे पातळी घसरल्याचं लक्षण आहे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर ट्विट करून नवीन वाद ओढवून घेतला होता. सुशांतसिंह राजपूतचं प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं जातं आहे, त्यावरून मुंबईनं माणुसकी गमावलीये असं ट्विट त्यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटवरून मुंबई पोलिसांवर अविश्वास असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, अमृता फडणवीस यांनी केलेलं हे ट्विट सुशांतसिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here