मुंबई : मागील वर्षभरात शेअर बाजारात उलथापालथ झाली असली तरी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानी चांगली कमाई केली आहे. याच तेजीच्या लाटेत आयसीआयसीआय समूहाचे शेअर चांगेलच वधारले असून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.

आयसीआयसीआय समूहातील मुख्य शेअर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ४८. ११ टक्के वाढ झाली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा शेअर ५९.६२ टक्क्यांनी वाढला आहे. सर्वसाधारण विमा व्यवसायातील आयसीआयसीआय लुम्बार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या शेअरमध्ये ५८.१४ टक्के आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्सच्या शेअरमध्ये ५३.०८ टक्के वाढ झाली आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात २८ टक्के घसरण झाली होती. करभारामुळे बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला होता. बँकेला ६४५ कोटींचा नफा झाला. मात्र बँकेच्या बुडीत कर्जात सुधारणा झाली होती. काही ब्रोकरेज संस्थांनी आयसीआयसीआय बँकेचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय सिक्युरीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here