म.टा. प्रतिनिधी, नगर: मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री विरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी तर कंगना यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ते नगर मध्ये बोलत होते.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे आज नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांची संवाद साधताना मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘कंगना रणौटचा विषय हा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. जनतेला सर्व काही समजते. जनता जनार्दन अशा गोष्टींना किंमत देत नाही. जो महाराष्ट्राच्या मातीत राहतो, महाराष्ट्राच्या मातीमधील अन्न खातो, आणि महाराष्ट्राच्या पोलिसांच्या प्रती शंका व्यक्त करतो, पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत मुंबईची तुलना करतो, मला वाटतं अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. आज आपल्यासमोर फार प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. कोणालातरी केवळ प्रसिद्धीसाठी एखादी बाब करायची असेल तर त्याला किती महत्व द्यायचे, हे आपण ठरवले पाहिजे,’ असेही भुसे म्हणाले.

काय आहे नेमका वाद

काही दिसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका केली होती.’मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. ‘मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,’ असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर कंगनानं कांगावा करत संजय राऊत यांनी मला धमकी दिल्याचं म्हटलं आहे. मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय,’ असं ट्वीट तिनं गुरुवारी केलं होतं.

कंगनाच्या या ट्विटनंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर कंगनानं आज सकाळी कंगनानं ट्विट करत ‘मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल रोखून दाखवा, असं थेट आव्हान दिलं होतं. कंगनानं केलेल्या या ट्विटनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेत्यांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. राज्यातील विविध भागांत कंगनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर, मुंबईतील शिवसेना भवनासमोर महिला आघाडीनं कंगनाचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here