आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. मात्र झालेल्या सामन्यात चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन झाले. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. त्याने रोहित आणि विराट कोहली या दोघांना आऊट करत माघारी परत पाठवले.

यानंतर हारिस रौफनेही धुमाकूळ घातला. भारताने ६६ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी डाव सांभाळला होता. संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी केली. इशान किशनचे शतक हुकले पण त्याच्या आणि पांड्याच्या भागीदारीमुळे भारताला २५० धावांचा टप्पा पार करता आला. इशान ८२ धावा करून बाद झाला. त्याची विकेट हरिस रौफने घेतली. मात्र, इशानला बाद केल्यानंतर हरिसने असे कृत्य केले की सगळेच पहातच बसले.
IND v PAK सामना रद्द झाल्यावर भारत आता सुपर-४ मध्ये कसा पोहोचणार, जाणून घ्या समीकरण…
भारतीय डावाच्या ३८व्या षटकात हरिसने इशानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेट मिळाल्याच्या आनंदात त्याचा संयम सुटला. इशानकडे रागाने पाहत त्याला हाताचा इशारा करून बाहेर जाण्यास सांगितले. यावर ईशानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र हार्दिक पांड्या ही संपूर्ण घटना दुसऱ्या पाहत होता. त्याने या गोष्टीचा हरिसकडून बदला घेतला.

भारतीय डावातील ४०वे षटक टाकण्यासाठी हरिस आला. या षटकात पांड्याने दणदणीत तीन चौकार मारले. त्यानंतर इशानकडे बोट दाखवल्याचा बदला घेतला. ३ चौकार मारल्यानंतर हरिसची चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचे पहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हार्दिकलाही शतक पूर्ण करता आले नाही. त्याने ८७ धावांची वादळी खेळी खेळली. हार्दिकने ७ चौकार आणि १ षटकार लगावला. हार्दिक आणि ईशानमध्ये पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here